Saturday, July 18, 2015

drow neet figures

कोथरूड, पुणे येथील इंग्रजी माध्यमाच्या एम. आय. टी शाळेतील इ. ८ वीच्या भूगोल विषयाच्या शिक्षिकेने drow neet figures असा शेरा एका विद्यार्थ्याच्या वहीवर लिहिला होता तो मी प्रत्यक्ष वाचला आहे. ' शिकवण्याचा ' चक्क अभिनय करणाऱ्या पुण्यातील इंग्रजी माध्यम शाळांमधील आघाडीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे. असो, असेच अनेक किस्से अनेक इंग्रजी माध्यम शाळांमध्ये घडले आहेत. सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असताना उत्तम इंग्रजी शिकवणे आणि उत्तम इंग्रजी बोलणे यासाठी प्रसिद्ध झालेल्या पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्यावर या शाळा इंग्रजीचे कसे वाभाडे काढतात त्यांचे काही नमुने पाहिल्यास इंग्रजी माध्यमाची शाळा निवडणे हा पालकांनी केलेला गुन्हा मानून मुलांचा छळ करण्याबाबत पालकांवर कारवाई व्हायला हवी, असे मला वाटू लागले आहे. इंग्रजी माध्यम शाळांमधील शिक्षकांनी तोडलेल्या ताऱ्यांचा हा ढीग पहा. सर्वांचे डोळे दिपून जातील.
१] children, draw a straight circle. circle should not go outside the circle.
2] both three of you, get out of class.
3] students, please give me a red pen of any colour.
4] why you are looking outside of class at that monkey, when I am here!
5] all must were the tie tight
६] fetch your parents tomorrow in the school.
पुढे लिहिवत नाही. मला भोवळ आली.
विशेष बाब म्हणजे, मराठी माध्यमातील कोणताही शिक्षक असले तारे तोडत नाही, कारण मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेवर त्याचा भाषिक पिंड पोसलेला असतो.
अशा भयानक इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मुले कोंबून त्यांचे आयुष्यभराचे नुकसान करणाऱ्या पालकांचे प्रबोधन वेगाने करण्याची आवश्यकता आहे. - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.