मराठी माध्यम निवडणाऱ्या सूज्ञ पालकांचा या अचूक आणि मुलांसाठी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्रातील पहिला सत्कार !
दि. २०/०१/२०१४ या दिवशी महाराष्ट्रातील शैक्षणिक माध्यम निवड एका नव्या वळणावर जाईल.
लहान, कमी अक्षरांचे शब्द, कमी शब्दांची वाक्ये, शब्दक्रमाबाबत खूप लवचीक असणारी वाक्ये, उच्चारताच अर्थ सूचित करणाऱ्या पारिभाषिक शब्दांचे प्रचंड प्रमाण ही मराठीची विशेष वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये जगातील कोणत्याही इतर अमराठी भाषेत एकत्रित स्वरुपात नाहीत. जगात ज्या भाषेतून सर्वाधिक विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत अशी भाषा म्हणजे मराठी ही प्रगत, समृद्ध, संपन्न भाषा आहे.
मित्र, नातेवाईक आणि शेजारी पाजारी यांनी आपापल्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन परक्या भाषेतूनच मुलांना शिकवण्याचा वारंवार दिलेला सल्ला बाजूला ठेवून आपल्या मुलांना मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून सर्व विषय शिकवणाऱ्या शाळेत घालण्याचा अनेक पालकांचा निर्णय अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.
अशा १८५ पालक जोडप्यांचा सत्कार दरोडे सभागृह, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाजवळ फिरीदिया वसतिगृहा शेजारी पुणे येथे २०/०१/२०१४ या दिवशी स. ११.०० ते दु. १.०० या वेळेत होईल.
प्रसिद्ध मराठी लेखक मा. भारत सासणे यांच्या हस्ते पालकांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचा अन्य तपशील आणि कार्यक्रमाचा वृतांत येथे दिला जाईल.
मा. भारत सासणे हे महाराष्ट्रातील निवृत्त जिल्हाधिकारी असून ते जिल्हाधिकारी असताना त्यांनी आपल्या मुलांना आवर्जून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आणि मुलांना उत्तम शिक्षणाची संधी मिळवून दिली. अशा सुयोग्य पाहुण्यांच्या हस्ते हा सत्कार आयोजित केला आहे. शक्य असेल त्या सर्व मराठीप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे शंभर कार्यक्रम येत्या दोन महिन्यात करण्याचे योजले आहे, त्या दृष्टीने ठिकाण, शाळा सुचवाव्यात - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.