सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रातील लाखो मम्मी, ममा, आई आपल्या ह्यांना म्हणू लागल्या, " मला मुले तुमच्यासारखी व्हायला नकोत, म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमातच घालायचा माझा आग्रह आहे "
त्यांचे बिचारे पती आपल्या प्रिय पत्नीला सांगायचा केविलवाणा प्रयत्न करीत होते की, ते स्वत: उत्तम शिकून ज्या शिक्षणाच्या जीवावर उत्तम कारकीर्द गाजवत आहेत तशाच मराठी माध्यमाच्या शाळेची निवड मुलांसाठी करू. त्यांचा कळकळीचा आग्रह धुडकावून स्त्री हट्ट तडीस जाऊन त्यांची मुले ' इंग्रजी माध्यम शाळा ' अशी पाटी लावलेल्या, शहरातील, गावातील, खेड्यातील महानगरातील अनेक NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE मध्ये शिकली.
लाखो मम्मी, ममा, आई यांनी उच्चारलेली शापवाणी ९९ % जणींबाबत दुर्दैवाने आणि वाईट अर्थाने खरी ठरली.
लाखो मम्मी, ममा, आई यांनी उच्चारलेली शापवाणी ९९ % जणींबाबत दुर्दैवाने आणि वाईट अर्थाने खरी ठरली.
त्यांची मुले बाबांसारखी झाली नाहीत.
१] बाबांना देणगीविना कोलेज प्रवेश! मुलांना गुणवत्तेअभावी देणगीमुळेच प्रवेश ! .
२] बाबांना वाशिल्याशिवाय नोकरी ! मुलांसाठी वशिला लावताना बाबा वाकून गेले
३] बाबांना स्वत:च्या विषयातील ज्ञान बरे होते, मुलांना विषयात चाचपडावे लागले.
४] बाबांना काटकसरीचे महत्व असल्याने कर्जमुक्त, मुले कर्जबाजारी.
५] बाबा कमी वयात स्वत:च्या पायावर उभे, मुलांना तिशीपर्यंत बाबांची काठी हाती !

आजही असे खुळचट स्त्री हट्ट घरोघरी सुरु असतात. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या न्यायाने महिलांनी आपला इंग्रजी माध्यमाचा चुकीचा हट्ट आवरता घ्यावा, मागील पिढीत अशी चूक केलेल्या महिलांनी आपल्या मुलीला, सुनेला हितोपदेश करावा आणि नातवंडे मराठी माध्यमात घालायचा आग्रह धरावा. तसे होत नसेल तर नव्या पिढीतील बाबांनी खंबीर रहावे आणि मुले महानगरपालिकेच्या किंवा खाजगी मराठी माध्यम शाळेत घालावी, मुलांचे भले करावे.
मुलांचे भले हे आपले मुख्य ध्येय असू द्यावे, हे आवाहन ! अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.