' घरवापसी ' कार्यक्रमाप्रमाणे ' माध्यम परतावणी ' आवश्यक !
मराठी ही जगातील पहिली सुसंघटित, विद्वानविरचित नागरी भाषा असावी, असा माझा अंदाज आहे. विद्वानांनी निर्माण केल्यामुळे या भाषेतील मूळ मराठी शब्द कमी अक्षरी, जोडाक्षरविरहित, उच्चारसुलभ आहेत. कथा, कादंबरी, पोवाडा, कविता, कीर्तन, ओवी, श्लोक, अभंग, वेचे, फटका, मंगलाष्टके, भारुड, बखर अशा सूक्ष्म भेदांनी वेगळे ठरणारे दोनशेहून अधिक साहित्यप्रकार मराठीत निर्माण झाले आहेत. लावणी, प्रवचन, पोवाडा, कीर्तन, संगीत नाटक, तमाशा, वासुदेव, भारुड, गोंधळ यासारखे सुमारे शंभर ज्ञान, अज्ञात सादरीकरणाचे प्रकार मराठीत निर्माण झाले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातही सोपे, चपखल, अर्थवाही पारिभाषिक शब्द देण्याची क्षमता मराठीत ठासून भरली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रासह जगातील कोणत्याही क्षेत्रात मराठी भाषा अधिक कार्यक्षम ठरू शकेल. याबाबत आत्मविश्वासापेक्षा न्यूनगंड पसरवण्याचे प्रकार दुर्दैवाने अधिक झाले, म्हणून मराठीला तिचे सर्वोच्च स्थान आजवर मिळाले नाही. ही स्थिती आपण बदलू शकतो.
पुणे मुंबईतील काही हितसंबंधी लोकांनी विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मराठी भाषा निरुपयोगी आणि इंग्रजी एकटीच उपयुक्त भाषा अशी आवई उठवून वार्षिक शंभर रुपयात मराठी माध्यमातून मिळणारे शिक्षण कमी दर्जाचे ठरवले आणि पालकांच्या खिशातून हजारो रुपये राजरोसपणे लुटण्यासाठी इंग्रजी माध्यमाची अतिरेकी भलावण केली. आर्थिक लूटमारीच्या या डावाला गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई भाग अधिक प्रमाणात बळी पडला.

या काळात पुणे, मुंबईतील पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या ' नादी ' लागून अपुऱ्या पात्रतेच्या कोन्वेंत छाप शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणावर समाधान मानताना जे अब्जावधी रुपये गमावले ते त्यांनी स्वेच्छेने उधळले म्हणून मला अशा पालकांच्या आर्थिक नुकसानीचे फारसे वाईट वाटत नाही, तो त्यांचा जाणून बुजून केलेला आत्मक्लेश होता. पालकांच्या आर्थिक नुकसानी पाठोपाठ
' विविध विषयांचे चांगले आकलन न होणे आणि उत्तम अभिव्यक्ती न करता येणे '
हे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान मात्र अधिक हानीकारक आहे. पुणे, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या या नुकसानीमुळे एकेकाळी भारतात नव्हे तर जगात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेला पुणे, मुंबई पट्टा आता महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये देखील पहिल्या २५ जिल्ह्यात नाही. गेल्या काही वर्षात दुर्दैवाने इंग्रजी माध्यमात घातलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील ' घरवापसी ' कार्यक्रमाप्रमाणे ' माध्यम परतावणी ' कार्यक्रम सुरु करण्याची आवश्यकता आहे.
आपली मुले इंग्रजी माध्यमात असून त्यांना विषय नीट, पूर्णपणे आणि समाधानकारकरीत्या समजत नाहीत अशा पालकांनी कृपया संपर्क साधावा. अनिल गोरे, मराठीकाका. ९४२२००१६७१.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.