पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापिका काळे या एक समजदार, विचारी महिला ठरल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी इंग्रजी माध्यमातील आपल्या पाल्याच्या प्रगतीचा अंदाज घेतला. अपेक्षित प्रगती होत नाही हे लक्षात येताच माध्यम बदलून इ. ३ रीत मराठी माध्यमात प्रवेश घेतला.
हा अत्यंत योग्य आणि अनुकरणीय निर्णय आहे. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेल्या मुलांची योग्य दिशेने प्रगती होत आहे की नाही याचा प्रत्येक पालकाने अंदाज घ्यावा आणि नंतर प्रगती योग्य नसल्यास सरळ माध्यम बदलावे आणि मराठी माध्यम या प्रगत, समृद्ध, संपन्न माध्यमाच्या शाळेत मुलांना प्रवेश घेऊन द्यावा. शाळेची स्थिती, लायकी, शिक्षकांची पात्रता, शिक्षकांचा अनुभव असे काही न पाहता डोळे झाकून ' इंग्रजी माध्यम शाळा ' अशी नवी, नवी, चमको पाटी पाहून मुलांना एखाद्या NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE मध्ये घातले असेल अशा प्रत्येक पालकाला आपली चूक सुधारायची संधी आहे. ही संधी ताबडतोब साधा. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. - अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.