उत्तम आकलन म्हणजे विविध विषयातील विविध प्रकारची माहिती ऐकणे, वाचणे, समजणे, त्यातील परस्परसंबंध लक्षात येणे.
उत्तम अभिव्यक्ति म्हणजे कोणत्याही विषयांतील आकलन झालेल्या बाबी इतरांपर्यंत तोंडी, लेखी पोचविता येणे किंवा आकलन झालेल्या बाबींचा मानवी जीवन अधिक सोयीस्कर, सुखकर, सुकर करण्यासाठी प्रभावी उपयोग करता येणे.
उत्तम आकलनशक्ती मिळावी आणि उत्कृष्ट अभिव्यक्ति साध्य व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था यात काही काळ घालवून या दोन्ही बाबी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे जमण्यासाठी करायचे प्रयत्न म्हणजे शिक्षण घेणे ! शिक्षण घेण्याचे दोन प्रकार आहेत - औपचारिक आणि अनौपचारिक
प्रचलित औपचारिक आणि किमान सामायिक असे शिक्षण घेण्यासाठी मानवाला सध्या तरी प्रामुख्याने एखाद्या भाषामाध्यमाची निवड करावी लागते. शिक्षणासाठी मराठी भाषा हे एक अतिशय प्रभावी भाषामाध्यम आहे. या माध्यमाचा लाभ खरेतर जगातील सर्वांनी घ्यायला हवा, महाराष्ट्रातील सर्वांनी तर घ्यावाच घ्यावा, असे मला वाटते.
मराठी हे अत्यंत प्रभावी भाषामाध्यम महाराष्ट्राला नैसर्गिक वारसा म्हणून उपलब्ध आहे. असंख्य विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिकायचे भाग्यही लाभले, लाभते आहे आणि त्यांची उत्तम प्रगतीही झाली आहे. महाराष्ट्रातील काही पालकांच्या मनातील समज, अपसमज, गैरसमज यामुळे त्यांच्या मुलांना मराठी माध्यमातून शिकण्याचे भाग्य मिळत नाही. महाराष्ट्रातील काही पालक आपल्या मुलांवर इंग्रजी माध्यम तर काही पालक आपल्या मुलांवर सेमी इंग्रजी माध्यम लादतात, त्यामुळे त्या मुलांच्या आकलन आणि अभिव्यक्ति क्षमतेत थोडी घट होते.
माध्यम निवडण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य सध्या पालकांना आहे. त्याचा वापर करून महाराष्ट्रीय पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यम निवडावे, असे मी सर्वांना आवाहन करतो. ज्यांना हे आवाहन पटत नाही किंवा हे आवाहन त्यांच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच त्यांनी अन्य माध्यम, विशेषत: इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यम निवडले असेल त्यांनी आपल्या मुलांच्या हितासाठी पुढीलपैकी किमान एक तरी बदल करावा, असे माझे आवाहन आहे.
बदल क्र. १ ] पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा किंवा वर्ग बदलून मुलांना पूर्ण मराठी माध्यमाच्या ( सेमी इंग्रजीचा पर्याय नसलेल्या ) वर्गात किंवा शाळेत दाखल करावे.
बदल क्र. २ ] आहे त्याच शाळेत किंवा वर्गात विद्यार्थ्यांना सर्व विषय इतर भाषामाध्यमात् शिकवून झाल्यावर मराठी या प्रगत भाषा माध्यमातून देखील पुन्हा एकदा शिकवण्याची मागणी करावी. ही मागणी शाळेत तर करावीच पण महाविद्यालये आणि विद्यापीठातही करावी. ही मागणी मान्य होईपर्यंत पाठपुरावा करावा.
बदल क्र. ३ ] शाळा आणि वर्ग यात वरील दोनपैकी कोणताही बदल घडवून आणणे पालकांना कोणत्याही कारणाने शक्य झाले नाही तर मुलांच्या हितासाठी शेवटचा पर्याय म्हणून इंग्रजी आणि सेमी इंग्रजी भाषामाध्यमातून शाळेत, वर्गात शिकवलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक घटक घरी मराठी माध्यमाच्या पुस्तकातून आणि मराठी भाषामाध्यमातून त्या, त्या विषयाशी संबंधित मराठी शब्दांसह पुन्हा एकदा शिकवावा किंवा स्वतंत्र शिकवणी लावून शिकवण्याची व्यवस्था करावी.
आपल्या लहान बाळाला त्याचे इवलेसे बोट धरून शाळेत घालताना त्या बाळाच्या भवितव्याबाबत जी स्वप्ने पालक पाहतात ती अधिकाधिक प्रमाणात यशस्वी होण्यासाठी मराठी या प्रगत, संपन्न, समृद्ध भाषेचा उपयोग वरील तीन पर्यायांपैकी जमेल त्या प्रकारे करून घ्यावा, अशी कळकळीची आणि गंभीर सूचना ! - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.