convent चा मूळ अर्थ नन म्हणजे महिला धर्मोपदेशिकांचे निवासस्थान असाच आहे. युरोपात विधवा आणि विधुर यांची लग्ने मोठ्या प्रमाणात व्हावीत, मुले जन्माला घालण्यास सक्षम लोक मुले वाढवण्याच्या दृष्टीने अनुत्पादक अवस्थेत राहू नयेत आणि मुलांची संख्या भरमसाठ प्रमाणात वाढावी असा चर्चचा प्रयत्न होता. विधवांच्या अगोदरच्या विवाहातील मुले या कार्यक्रमात अडथळा ठरत होती. अशी मुले चर्चच्या आवारात सांभाळावी आणि पुनर्विवाहांना चालना द्यावी असा विचार झाला आणि पुन्हा विवाह करणाऱ्या स्त्रियांची मुले चर्चने सांभाळायला घेतली. मुले सांभाळणे हे केवळ स्त्रियांचे काम आहे अशी पक्की भूमिका असल्याने अशी मुले ननच्या निवासस्थानात म्हणजे convent मध्ये सांभाळली जाऊ लागली.
अशी मुले अगदीच निरक्षर राहू नयेत म्हणून convent ला जोडलेल्या आणि थोडेसे, जुजबी शिक्षण देणाऱ्याशाळा सुरु झाल्या. त्या शाळांना काही भारतीय लोक अत्यंत प्रगत अशा convent शाळा मानू लागले. त्या convent शाळेतील दुर्दैवी जीवांना मनपसंत कपडे घेण्याची ऐपत नसल्याने convent मधील मुलांना दानशूर लोक एकाच प्रकारचे कापडाचे तागे विकत घेऊन कपडे शिवून देत असत. केवळ दुर्दैवामुळे अशा सर्व मुलांचे कपडे सारखे असत पण काही मुर्ख पुणेकरांना असे कपडे हा शिस्त आणि समानतेचा मोठा अविष्कार वाटला आणि पुण्यातील इतर शाळांमध्ये देखील सनाथ मुलांसाठी अनाथांप्रमाणे गणवेश शिवायची प्रथा सुरु झाली .
convent च्या नावाखाली अनेक विषय अर्धवट शिकलेल्या किंवा अशिक्षित पण फक्त बायबल वाचता येणाऱ्या अडाणी शिक्षकांच्या हाताखाली गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे गंभीर विषय शिकण्यात काही अडाणी आणि मुर्ख पुणेकर धन्यता मानू लागले. सध्याच्या convent शाळांची स्थितीही अगदी पूर्वीसारखीच आहे. यातील बहुसंख्य शाळांमध्ये अत्यंत कमी पगारावर कमी पात्रतेचे शिक्षक फळ्याजवळ उभे राहून शिकवण्याचा फक्कड अभिनय करतात. अशा शाळांमध्ये मुलांना घालणारे पुणेकर सध्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढत आहेत, म्हणून convent ची खरी परिस्थिती सांगावी असा विचार मी केला ! समोर खड्डा आहे असे आपण लोकांना सांगू शकतो, पण वेगाने धावत जाऊन खड्ड्यात पडायचा निर्धार केलेल्या पदवीधर होऊनही अशिक्षित राहिलेल्या लोकांना त्या खड्ड्यात पडण्यापासून अडवू शकत नाही, कारण लोकशाही ! लोकशाहीत प्रत्येकाला हवी त्याची किंवा हव्या त्या विचाराची गुलामी करण्याचे स्वातंत्र्य आहे.
अशा खड्ड्यात स्वखुशीने उडी मारणाऱ्यांना त्यातून बाहेर यायची इच्छा झालीच तर मला भेटावे, योग्य मार्गदर्शन करीन. - अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.