Saturday, July 18, 2015

मराठीकरण

केवळ शिक्षण नव्हे तर उद्योग, प्रशिक्षण, सादरीकरण, प्रशासन, संशोधन, संपर्क, संज्ञापन अशा सर्व मानवी गरजांसाठी मराठी भाषा आणि देवनागरी लिपी यांचा संयुक्त वापर सर्व जगासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. गेली काही वर्षे लोक अन्य भाषा वापरत असतील किंवा लोकांना सराव झाला आहे म्हणून आणखी अनंत काळ आपण मराठीचा संकोच करून इतर भाषांचा वापर करू हा जुनाट, बुरसटलेला आणि प्रतिगामी विचार महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवा.
अनेक वर्षे सुरु असलेल्या अनेक प्रथा, पद्धती उदा. लाकडाच्या चुलीवर स्वैपाक, उघड्यावरील शौचाला जाणे, बैलगाडीने प्रवास वगैरेना अधिक चांगला पर्याय मिळाल्यावर आपण अधिक वेगवान, अधिक कार्यक्षम पर्याय स्वीकारले आणि त्यांचा वापर सुरु केला. याच प्रकारे विचार करून केवळ शिक्षण नव्हे तर उद्योग, प्रशिक्षण, सादरीकरण, प्रशासन, संशोधन, संपर्क, संज्ञापन अशा सर्व मानवी गरजांसाठी मराठी भाषा आणि देवनागरी लिपी यांचा संयुक्त वापर संपूर्ण जगात होण्यासाठी मराठी भाषकांनी प्रयत्न सुरु केले पाहिजेत. चला आपल्यापासून सुरुवात करू या आणि आपल्यानंतर प्रथम इंग्लंडमध्ये आपल्या प्रगत भाषेचा प्रसार करुया !
अखिल इंग्लंड मराठी संवर्धन परिषद अशी संस्था सुरु करण्यात कोणाकोणाला रस आहे त्यांनी कृपया संपर्क साधावा. जगातील सर्वात प्रगत भाषा इंग्लंडमधील लोकांनी स्वीकारली की मग इंग्रजीबाबत अंधश्रद्धा बाळगणारे अनेक देशातील लोक मराठी या प्रगत भाषेच्या आधारे आपली प्रगती करून घेऊ शकतील. -अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.