मराठी ही जगातील सर्वात पहिली नागरी भाषा आहे असा दावा असणारा माझा लेख २३ जानेवारी २०१५ च्या सामना अंकात आहे. समूहाने जगल्या जाणाऱ्या नागरी जीवनात वापरण्यास आवश्यक असे सोपे, लहान शब्द मराठीत वापरले जाऊन संपले म्हणून इतर अनेक भाषांमध्ये लांबलचक किंवा अधिक गुंतागुंतीचे शब्द वापरणे भाग पडले असावे, असे माझे म्हणणे आहे. मराठीच्या या सोप्या, सहज प्रवाही स्वरूपामुळे १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा, अधिकोष ( बँक ) भरती, लष्कर भरती, खाजगी उद्योगातील नोकर भरती, खाजगी स्वयंरोजगार, दुकान चालवणे, निर्माणी ( वस्तू निर्मिती आस्थापना ), व्यापार, निर्यात, लेखन, प्रकाशन, अध्यापन, समुपदेशन अशा कोणत्याही कामात तसेच इंग्रजी केंद्रित अशा काही परदेशात जाण्यासाठी इंग्रजी या मागासलेल्या भाषेतील कौशल्य तपासणाऱ्या काही परीक्षा अशा प्रत्येक ठिकाणी ............
१ ली ते १० वी पर्यंत मराठी माध्यमाच्या संघटित शिक्षण देणाऱ्या, स्वत: पुरेसे शिकलेले, नियमित प्रशिक्षण मिळणारे शिक्षक असलेल्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थी आघाडीवर असतात.
नवतरुण पालकांनी या वस्तुस्थितीचा स्वत: अभ्यास करून मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे आणि ' मराठी बोला चळवळ ' स्वतंत्रपणे करावी लागणार नाही अशी काळजी घ्यावी. आपली ही चळवळ करण्याचे कारण उरणार नाही अशी स्थिती आणू या ! मराठी ही जगातील सर्वोत्तम, सुंदर, संपन्न, समृद्ध, दर्जेदार भाषा ज्यांना समजते त्यांनी आपले हे भाग्य आपल्या हातातून निसटू देऊ नये, असे मी सुचवतो. मराठी माध्यमाची शाळा निवडताना त्या शाळेत सेमी इंग्रजी हा पर्याय नसलेले वर्ग निवडा. कोणाच्या खुळचट सल्ल्यावरून इंग्रजी माध्यम किंवा सेमी इंग्रजी माध्यम निवडले तर यश आपल्यापासून दूर दूर पळत राहिल्याचा अनुभव वारंवार येत राहील, याची खात्री बाळगावी. असा अनुभव सध्या महाराष्ट्रातील असंख्य पालक दररोज घेत आहेत. माझ्या या म्हणण्याला काही थोडे सन्माननीय अपवाद असतात पण अपवाद नेहेमी फारच कमी प्रमाणात असल्याने यशाची आशा ! मराठी भाषा !! हा मंत्र अनुसरावा, हे उत्तम.
मराठी माध्यमाची शाळा निवडताना जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषद यांनी चालवलेल्या मराठी माध्यम शाळांना प्राधान्य द्यावे. त्या ठिकाणी प्रवेश न मिळाल्यास खाजगी पण शासन अनुदानित मराठी माध्यम शाळांची निवड करावी. या निवडीचा अभिमान वाटेल अशी कामगिरी मुलांनी करावी असे वाटत असेल तर सेमी इंग्रजीचे खूळ मात्र शिक्षणाबाहेर ठेवावे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी भाषा नावाचा विषय नीट शिकावा आणि इंग्रजी भाषा नीट आणि चांगली शिकवली जाण्याची शक्यता मराठी माध्यमाच्या शाळेत सर्वाधिक असते. - अनिल गोरे, मराठीकाका, पुणे

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.