इंग्रजी या मागासलेल्या भाषेतून सर्व विषय शिकवणाऱ्या इंग्रजी माध्यम शाळेत मुलांना घातले, भरपूर पैसे देणगी म्हणून दिले, भरभक्कम वार्षिक शुल्क दिले पण मुलांची प्रगती होत नाही हे अनेक पालकांच्या लक्षात येते, पण इंग्रजी माध्यम निवडल्यावर त्यात बदल करताच येत नाही असा अनेक पालकांचा समज होता. पालकांची इच्छा असल्यास इंग्रजी माध्यमातून मुले काढून मराठी माध्यमात प्रवेश घेता येतो. माध्यम बदलास बंदी घालणारा कोणताही नियम नाही, याची माहिती मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दिल्यावर अनेकांना मार्ग सापडला. पुण्यातील काही पालकांनी माध्यम बदलून मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेतले आणि मुलांना अधिक चांगले समजू लागल्याचा अनुभव देखील घेतला. या पालकांनी स्वीकारलेला मार्ग कोणीही स्वीकारू शकेल.
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांनो, वाट कशाची बघताय ?
इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांची खरी स्थिती जाणून घ्या आणि ती समाधानकारक नसेल तर माध्यम बदलून मराठी माध्यम निवडा!
अनिल गोरे, मराठीकाका.
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांनो, वाट कशाची बघताय ?
इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांची खरी स्थिती जाणून घ्या आणि ती समाधानकारक नसेल तर माध्यम बदलून मराठी माध्यम निवडा!
अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.