भारतीय वनसेवा अधिकारी पद भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, भारत सरकारने २०१४ मध्ये घेतलेल्या परीक्षेच्या मुख्य फेरीचा निकाल दि. १८/०२/२०१५ ला लागला. महाराष्ट्रातील सात विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले असून सर्व मराठी माध्यमाचेच आहेत.
मराठी माध्यमात शिकल्याने एकूण भाषिक कौशल्य अधिक विकसित झाले, इंग्रजी व्याकरण पक्के झाले त्यामुळे इंग्रजीतून लिहायची उत्तरे नीट लिहिता आली, मुलाखतीत हळू पण बिनचूक इंग्रजी बोलता आले तसेच एकूण आकलन, अभिव्यक्तीचा दर्जा सुधारला होता, म्हणून यांना मानाचे प्रतिष्ठित पद मिळाले.
सर्व तरुण उत्साही पालकांनो, यातून धडा घ्या आणि मुलांना मराठी माध्यम शाळेत तरी घाला किंवा ....
शेजारी पाजारी प्रतिष्ठा मिळावी म्हणून इंग्रजी माध्यमात घातले असेल तर घरी मात्र शाळेतील विषयांची मराठी माध्यमाची पुस्तके आणा. मराठी बोलू नये असे सांगणाऱ्या इंग्रजी माध्यमातील मुर्ख अडाणी शिक्षकांचा नियम फक्त शाळेत पाळून घरी आणलेल्या मराठी माध्यमाच्या पुस्तकातून गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण हे सर्व विषय घरी पुन्हा एकदा मराठीतून शिकवा.
मोठ्या यशासाठी, इंग्रजी व्याकरण सुधारण्यासाठी, इंग्रजी अचूक बोलता यावे अशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी इंग्रजी माध्यमातील मुलांना या पायाभूत सुविधा शाळेत उपलब्ध नसल्याने घरी तरी द्या आणि आपले कर्तव्य नीट करा असे पालकांना आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.