🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔸
सुलभ आणि आकलनाला सोपी मराठी भाषा,
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
बहुसंख्य मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा छोटे असतात.
उदा:-
👉छेद - denominator,
👉अंश - numerator,
👉फलन - fertilisation,
👉वेग - velocity,
👉कलन - derivative,
👉कर्ण - diagonal,
👉वीज - electricity,
👉प्रशासन - administration,
👉गणित - mathematics,
👉क्लिष्ट - complicated,
👉हात - hand,
👉प्रवास - travel,
👉घर - house,
👉परीघ - circumference,
👉श्री - shree,
👉गडहिंग्लज - gadahinglaj,
👉रेणू - molecule,
👉महाराष्ट्र - maharashatra,
👉एकदिश - unidirectional.
फारच थोडे मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा मोठे आहेत.
उदा:
👉ओबडधोबड - rough,
👉कार्यक्रमपत्रिका - agenda
👉एकमेवाद्वितीय - unique.
९९ % मराठी शब्दांना जितकी मराठी अक्षरे लागतात, त्यापेक्षा त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांना दुप्पट ते पाचपट इंग्रजी अक्षरे लागतात.
ख) बहुसंख्य मराठी वाक्ये त्यांच्या इंग्रजी भाषांतरापेक्षा छोटी असतात.
१)'वस्तूवर बल लावल्याने वस्तू प्रवेगित होते’ हे ६ शब्द, १८ अक्षरी मराठी वाक्य इंग्रजीत ‘when a force is applied on a body, an acceleration is produced in that body' असे पंधरा शब्द-एकोणसाठ अक्षरी होते. मराठीमुळे इथे ६५% अक्षरबचत होते.
२)'एका वर्तुळकंसात आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या त्या वर्तुळाच्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते' हे १४ शब्द ४४ अक्षरी प्रमेय इंग्रजीत 'the measure of an angle inscribed in an arc of a circle is half of the measure of the arc of that circle intercepted by that angle' सत्तावीस शब्द, १०४ अक्षरी होते. मराठीमुळे इथे ५३ % अक्षरबचत होते.
हे अपवाद नसून बहुतेक वाक्यात अशीच स्थिती आढळते. कोणत्याही इंग्रजी मजकुराचा मराठी अनुवाद करून होणारी ४० % ते ७० % बचत स्वत: पडताळून बघा.
मराठीतून कमी वेळेत अभ्यास होऊन मुले उत्साही आणि आनंदी राहतात ...
अशा अनेक फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आजच मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घ्या ...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अधिक माहितीसाठी संपर्क साधा ...
✏मराठी काका - अनिल गोरे
📞९४२२००१६७१
📧 MarathiKaka@gmail.com
🚩मराठी शाळांचे शिलेदार समूह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀